आपण मधुमेही आहात व आयुष्यभर आपणास या मधुमेहाची काळजी घेऊन तो नियंत्रणात ठेवायचा आहे हे कधीही विसरु नका. आपला आहार, व्यायाम, उपचार, नियमित तपासणी व रक्त चाचणी याबद्दल डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा.
दर दोन महिन्यांनी आपला डॉक्टरांकडे जाऊन वजन, रक्तदाब (बी.पी.), डोळे, हृदय, चेतासंस्था इ. ची नीट तपासणी करुन घ्या. अशा नियमित तपासणीतून मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या व्याधींचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे शक्य होते व त्यावर योग्य ते
उपचार करणे शक्य होते. आपल्या पायांकडे अधिक लक्ष द्या. पायांची काळजी कशी घ्यावी याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मला मधुमेह आहे असे ओळखपत्र नेहमी आपणांसोबत ठेवा.
लक्षात ठेवा : मधुमेहाची व्यवस्थित काळजी घेतली तर आपण देखील इतरांप्रमाणे सुखासमाधानाने दिर्घायुष्य जगू.
HbA1c, S.Creat, Lipid Profile, Urine Micral तपासणी दर ३ महिन्यातून एकदा करून घ्या.
मधुमेह व्यक्तींसाठी आहार विषयी सर्वसाधारण
सर्वसामान्य व्यक्तींचा आहार आणि मधुमेही व्यक्तींचा आहार यामध्ये फारसा फरक नाही.
गोड पदार्थ सोडल्यास इतर सर्व पदार्थ योग्य त्या प्रमाणात खाल्ले तरी चालतात. दिवसातून १ किंवा २ वेळा भरपूर जेवण्यापेक्षा ४ ते ५ वेळा थोडे थोडे खाणे जास्त फायद्याचे असते.
फळे : सफरचंद, अननस, संत्रे, मोसंबी, पपई, डाळींब, अंजीर सर्व साधारण प्रमाणात खाल्ली तरी चालतील.
तेल, तूप, तळलेले पदार्थ, लोणची, मीठ कमी प्रमाणात खावे.
मांसाहार कमी करावा, मासे खाल्लेले चांगले.
मधुमेह माणसांचा दिनक्रम खालीलप्रमाणे असावा.
सकाळी ७ : १ कप साय काढलेले गाईचे दुध / बिनसाखरेचा चहा + २ मारी बिस्किटे
सकाळी ७ ते ७.३० : व्यायाम (भरभर चालणे / सायकल चालविणे / पोहणे) : नाष्टा (१ प्लेट उपमा / पोहे /२ इडल्या / २ बलक काढून अंडी) + १ वाटी मोड आलेले कडधान्ये + १ फळ
सकाळी ८.३० : १फळ
सकाळी ११ दुपारी : जेवण: भरपूर सॅलड (गाजर, काकडी, मूळा, टोमॅटो) + १ वाटी दही + १ वाटी मोड आलेले कडधान्ये + १ वाटी डाळीचे वरण / आमटी + १ वाटी उसळ / फळभाजी + २ वाटी हिरवी पालेभाजी + दिड चपाती / १ भाकरी + अर्धा वाट भात (सॅलड व भाज्यांचे प्रमाण कमी असावे.)
सायं. ४ ते ६ : १फळ (सफरचंद, पेरु, मोसंबी, डाळींब, अंजीर, संत्रे), चहा बिनसाखरेचा + ४ मारी बिस्किट + इतर फळे : जेवण: वरील प्रमाणे जेवण, सर्वसाधारणपणे अगोदर जर १ चपाती तर आता दिड चपाती व थोडासा
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.