प्लास्टर घातल्यानंतर घ्यावयाची काळजी

  • हात गळ्यात / उंचावर ठेवणे.
  • पाय २ - ३ उशांवर ठेवणे.
  • प्लास्टर ओले करु नये.
  • प्लास्टरच्या आत खाज आल्यास पावडर आत टाकणे.
  • सुज किंवा वेदना वाढल्यास त्वरीत संपर्क साधणे. दिलेल्या तारखेस किंवा त्यानंतर प्लास्टर काढता येते.
  • त्याआधी परस्पर काढून घेऊ नये.
  • दिलेली औषधे नियमित व वेळेवर घ्यावी, तसेच सांगितलेल्या सुचनांचे पालन करावे.

मानदुखी असलेल्या पेशंटनी घ्यावयाची काळजी

  • मानेवर ताण येईल अशा हालचाली टाळणे.
  • हातात जड वजन उचलू नये. डोक्यावर वजन घेऊ नये.
  • मान एकाच स्थितीत दिर्घकाळ ठेवू नये.
  • दुचाकी प्रवास टाळणे
  • गरम शेकणे.
  • मानेखाली आधार मिळेल अशी उशी वापरणे.

पाठ / कंबर दुखी असलेल्या पेशंटनी घ्यावयाची काळजी

  • समोर वाकु नये, वजन उचलू नये.
  • न टेकता बसु नये.
  • प्रवास विशेषतः दुचाकी टाळणे.
  • झोपेतून उठताना एका कुशीवर वळून मगच उठणे.
  • गरम शेकुन हलक्या हाताने मलम लावणे.
  • शिकविलेले व्यायाम नियमित करणे.

गुडघेदुखी असलेल्या पेशंटनी घ्यावयाची काळजी

  • उठ-बस करु नये.
  • जिना चढ-उतार करु नये.
  • खाली, मांडी घालून, दोन पायावर बसू नये.
 
टाचदुखी असलेल्या पेशंटनी घ्यावयाची काळजी

Did you find this topic helpful?
?
Ask Question
AboutMyClinic
SmartSite created on AboutMyClinic.com
Disclaimer: The information provided here should not be used during any medical emergency or for the diagnosis or treatment of any medical condition. The information is provided solely for educational purpose and should not be considered a substitute for medical advice.